जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले असून दररोज दिवसा, रात्री चोरटे डाव साधत असल्याची बातमी समोर येत आहे. ३१ जुलै रोजी यावलात पुन्हा एका घरात चोरट्यानी डाव साधून घरातील पेटीसह १ लाख १९ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. याबाबत येथील पोलिसांत अज्ञात भात्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरलीधर वना पाटील (वय ६३, रा.मालोद ता. यावल) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. पाटील यांच्या स्वयंपाक घरातील लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात भामट्यानी घरातील एका पेटीत ठेवलेले १ लाख ५ हजाराची सोन्याची मंगल पोत, १८ हजाराचे कानातले, १५ हजाराचे काप, ५१ हजाराची गळयातील चैन, १५ हजाराची अंगठी असे एकूण १ लाख १९ हजार रुपयांचे दागिने लंपास केले.
या प्रकरणी पाटील यावल पोलिसांत फिर्याद दाखल केली. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी भेट दिली. त्यानुसार ४५७, ३८० भादंवि कलम प्रमाणे अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुदाम काकडे करत आहेत.