जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । नीट, जेईई, होमी भाभा सारख्या महत्वाच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेला सेमीनार दि.१६ आणि १७ रोजी जळगाव, भुसावळात होत आहे. मोफत प्रवेश असलेल्या या सेमीनारचे आयोजन मोशन जळगाव व भुसावळतर्फे करण्यात आले आहे.
मोशन या नामांकित संस्थेतर्फे उच्च शिक्षणाची उंच भरारी घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सेमिनारचे आज आयोजन करण्यात आले आहे. दि.१६ रोजी जळगावात छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येते संध्याकाळी 5।30 ते 8 यावेळेस तर दि.१७ रोजी भुसावळ येथे संध्याकाळी 5.३० ते 8 या वेळेत मोशन centre साई जीवन सुपेरशॉप जवळ यावल रोड येथे हा सेमीनार घेतला जाणार असून यात मोशन चे कोटा येथील सह संचालक अमित वर्मा, मोशन चे maths विभागप्रमुख आतिष अग्रवाल कोटा, मोशन चे डायरेक्टर नितीन पाटील हे मार्गदर्शन करणार आहे. नीट आणि जेईईत यश संपादन केलेले विद्यार्थी देखील आपला अनुभव सांगणार आहेत.
सेमीनारला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असून विजेत्यांना आयआयटी मुंबई व किंग एडवर्ड हॉस्पिटल, सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजला भेट देण्याची संधी मिळणार आहे.