---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर महाराष्ट्र राजकारण विशेष

शरद पवारांच्या ताफ्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी; अजिंठा चौफुलीवर भव्य स्वागत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | ५ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज (दि.५) जळगाव शहरातील सागर पार्कवर जाहीर सभा होणार आहे. दुपारी दीड वाजता सभेची वेळ आहे. दरम्यान सकाळी १०.४५च्या सुमारास शरद पवारांचे शहरात आगमन झाले. यावेळी शहरातील अजिंठा चौफुलीवर शरद पवार यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शरद पवारांच्या स्वागतासाठी ढोल ताशा पथकांसह जीसीबी देखील आणण्यात आले होते. जीसीबींवरुन शरद पवारांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी एक मोठ्या क्रेनवर भव्य हार देखील होता.

Dr Ketki Patil 1 jpg webp webp

खासदार शरद पवारांचे मंबईहून सकाळी १० .१५ वाजेच्या सुमारास जळगाव विमानतळावर आगमन झाले. तेथून ते शहरात येण्यासाठी निघाल्यानंतर जागोजागी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, अजिंठा चौफुलीवर त्यांचे भव्य व जंगी स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वतीने जळगाव शहरात शरद पवार यांच्या आगमन होताच तब्बल पाच जेसीबीच्या साह्याने भव्य अशी पुष्पृष्टी तसेच तब्बल सहा क्विंटलचा भला मोठा हार घालून शरद पवार यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेथे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व नेते उपस्थित होते. त्यानंतर ते त्यांनी मेहरूण येथे महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानी भेट दिली. मेहरुणमध्येही त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

---Advertisement---

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार यांची जळगाव जिल्ह्यात पहिलीच सभा होणार आहे. या सभेकडे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पाहिले जात आहे. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीकडून राज्यातील आतापर्यंतच्या सर्व सभांपेक्षा जळगावची सभा सर्वात मोठी ठरावी यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सागर पार्कवर भव्य मंडप उभारण्यात आला असून, ३० हजार जण उपस्थित राहतील असा दावा केला जात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---