जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२६ । लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज असून लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारी हप्त्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

फेब्रुवारी महिना संपत आला तरी अद्याप जानेवारीचा हफ्ता खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांकडून सातत्याने प्रश्न विचारला जात होता. अखेर काल सोमवारपासून जानेवारीचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या तरी पात्र महिलांना फक्त जानेवारीचा हप्ता म्हणून १५०० रुपये मिळत आहेत. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार, याबाबतचं प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाभार्थी महिलांना अनपेक्षित गिफ्ट मिळालं आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिना संपायला अवघे काही दिवसच बाकी असल्यानं जानेवारी-फेब्रुवारीचे पैसे एकत्र येतील, असं सांगितलं जात होते. त्यानंतर आता एकाच महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे. जानेवारीचे १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

या महिलांना मिळणार पैसे
लाडकी बहीण योजनेत पात्र महिला ज्यांनी ईकेवायसी केली आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ईकेवायसी करण्याची मुदत आता संपली आहे. दरम्यान, ईकेवायसीमध्ये चुका असल्याने अनेक महिलांना मागच्या महिन्याचाही लाभ मिळाला नव्हता. त्या महिलांना या महिन्यातदेखील पैसे मिळणार नाहीत. त्यांना मार्च महिन्यानंतर रखडलेले हप्ते एकत्रितपणे दिले जातील.










