गुन्हेजळगाव जिल्हा

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळली ; 6 जण गंभीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२४ । जामनेरहून मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या बसला निमखेडी खुर्द फाट्याजवळील नर्सरीजवळ अपघात झाला. यात ८ प्रवासी जखमी झाले असून यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.

याबाबत असे की, मुक्ताईनगर आगाराची बस (एम.एच.१९-८७११) जामनेर येथून मुक्ताईनगरकडे येत होती. या दरम्यान, बसमध्ये ८ प्रवासी होते. निमखेडी खुर्द फाट्याजवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस झाडावर आदळली. त्यात सर्व प्रवासी जखमी झाले. ही माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. स्वतः सरकारी दवाखाना गाठला. परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते. जखमींच्या उपचाराचा खर्च महामंडळ करणार आहे. दरम्यान, सहा गंभीर जखमींना जळगावला हलवले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button