⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

आमदार चंद्रकांत पाटीलांच्या गाडीचा अपघात, ताफ्यातील पोलीस गाडीची धडक

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२४ । मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडी धडकल्याने अपघात झाला असून यात चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन पोलीस कर्मचारीदेखील किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार चंद्रकांत पाटील हे कुंड येथून मुक्ताईनगरकडे येत असतांना त्यांच्या वाहनाला ताफ्यातील पोलीस वाहनाने मागून टक्कर दिली. या अपघातात पोलिसांच्या गाडीचं बोनेटचं नुकसान झालं आहे. पण सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

संबंधित घटनेची दखल तातडीने प्रशासन आणि पोलिसांकडून घेण्यात आली. चंद्रकांत पाटील हे अपघातातून सुखरुप बचावले आहेत. चंद्रकांत पाटील यांना अपघातानंतर तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी त्यांची प्राथनिक तपासणी केली