जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ मे २०२१ । पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टी जामनेर तालुकाच्या वतीने जाहीर निषेध करत नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या उपस्थतीत दि.५ आज तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, दिलीप खोडपे सर ,बाबुराव अण्णा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तसेच कार्यकर्त्यांनी राज्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर हल्ला करून महिला पदाधिकाऱ्यांचा अमानुष अत्याचार व कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली तसेच व्यवसायीकाच्या ठिकाणांना आगी लावण्यात आल्या अशा प्रकारे लोकशाहीची हत्या व भारतीय राज्यघटनेचा अपमान असून हल्ला करणाऱ्या तृणमूल काँग्रेस च्या गुंडावर कठोर कारवाई करण्यात यावी व पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचाराचा अग्नितांडव तत्काळ थांबवन्यात यावा या आशयाचे जाहीर निषेध चे निवेदन भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी निवेदनावर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, नगराध्यक्षा सौ.साधना महाजन ,भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर माजी जिल्हाध्यक्ष दिलीप खोडपे सर, प. स. सभापती जलाल तडवी, शहराध्यक्ष अतिश झाल्टे, तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे , आनंदा लव्हारे, युवा मोर्चा अध्यक्ष निलेश चव्हाण, गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे,विलास बापू, नगरसेवक दत्तात्रय सोनवणे, बाबुराव हिवराळे , अनिस शेख, नाजिम पार्टी,सुहास पाटील, प्रमोद वाघ,स्वी सहाय्यक दीपक तायडे, तेजस पाटील, हेमंत वाणी, कैलास पालवे आदींच्या स्वाक्षऱ्या असून यावेळी भाजपा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.