⁠ 
शनिवार, जून 15, 2024

Jamner : चारचाकी व दुचाकीच्या भीषण अपघातात तरुण ठार, पाच जण जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२३ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशातच आता चारचाकी व दुचाकी वाहनाचा भीषण अपघात आज शनिवारी झाला असून यात शिरसाळा मारूती दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना जामनेर शहराजवळील भवानी घाटात घडली. यावेळी पाचोरा तालुक्यातील पुंनगाव येथील तिघेजण शिरसाळा मारुती मंदिरात दर्शनासाठी जात होते. तर बोदवडकडून ४ चाकी वाहन जामनेरकडे येत होते.

यादरम्यान, दोघा वाहनांनी भवानी घाटात समोरासमोर धडक झाली. या अपघातात अर्जुन सुकलाल जाधव या तरुणाचा मृत्यू झाला. तर अर्जुन जाधव सुरवाडे व तुषार संतोष जामदार रा. पुंगाव हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहन नाल्यात जावून पडल्याने कारमधील गीतांजली सुहास बांगर, वंदना माधव दांभोरे, प्राजक्ता विठ्ठल आसुदे रा. छत्रपती संभाजीनगर हे जखमी झाले. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.