⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | राष्ट्रीय | Jammu and Kashmir : कुलगाममध्ये दहशदवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ जवान शहीद

Jammu and Kashmir : कुलगाममध्ये दहशदवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ जवान शहीद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| ५ ऑगस्ट २०२३। जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी (Terrorist Attack) झालेल्या चकमकीत लष्कराचे 3 जवान शहीद झाले. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात अतिरेकी असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचं चकमकीत रूपांतर झालं. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.

या गोळीबारात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. श्रीनगरस्थित लष्कराच्या चिनार कॉर्प्सनं एका ट्विटमध्ये म्हटलंय, ‘कुलगाममधील हलानच्या उंच भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी ४ ऑगस्ट रोजी कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले आणि उपचारादरम्यान ते शहीद झाले.

लष्कर अधिकाऱ्यानं सांगितलं की, चकमकीच्या ठिकाणी आणखी फौजा पाठवण्यात आल्या असून शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. यापूर्वी, काश्मीरमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तौयबा (एलईटी) ची शाखा ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला येथील इम्रान अहमद नजर, श्रीनगर येथील वसीम अहमद मट्टा आणि बिजबेहारा येथील वकील अहमद भट अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तीन हातबॉम्ब, १० राउंड पिस्तूल, २५ एके-४७ रायफल आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह