जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । जळगाव येथे 15 मे रोजी माली साम्राज्य समता विचार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील उद्योजकांचा स्मार्ट उद्योजक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यामध्ये जळगाव येथील अर्चना ब्युटी पार्लर च्या संचालिका अर्चना माळी यांचादेखील स्मार्ट उद्योजक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
पुरस्काराचे सन्मानचिन्ह राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी व्यासपीठावर उद्योजक मुरलीधर महाजन, जळगाव जनता बँकेचे राजेश महाजन, नाशिक येथील उद्योजक कमलाकर चौधरी, जिल्हा परिषद सदस्य नाना भाऊ महाजन, नगरसेविका सरिता नेरकर, संध्या माळी, यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
माळी यांना स्मार्ट पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.