⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | वाणिज्य | जळगावकरांनी लुटला चांद्रयान ३ लॅडिंगचा मोठ्या स्क्रीनवर आनंद

जळगावकरांनी लुटला चांद्रयान ३ लॅडिंगचा मोठ्या स्क्रीनवर आनंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२३ । समस्त भारतीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद असणारी घटना बुधवारी (दि.२३) रोजी घडली ती म्हणजे चांद्रयान ३ चे (Chandrayaan 3) यशस्वी लॅडिंग. संपूर्ण देश या घटनेच्या प्रतिक्षेत असतांना शहरातील चार नागरिकांनी एकत्र येवून या घटनेचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर प्रक्षेपण करण्याचा संकल्प केला.

आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान ३ च्या विक्रम लॅंडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लॅंडिंग केले आहे. या अद्वितीय क्षणाचे राजेश पिंगळे, योगेश शुक्ल, प्रशांत जगताप, आशिष वाणी आणि मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून पांडे डेअरी चौकातील गौरीज प्रिंट हब येथे मोठी एलईडी स्क्रीन लावून लाइव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले. या लाइव्ह प्रक्षेपणासाठी त्यांना शाम देवरे यांचेही सहकार्य लाभले.

प्रक्षेपणाची सुरुवात जळगाव महानगर गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांतारामदादा सोनवणे, माजी नगराध्यक्ष बंडू दादा काळे यांच्या हस्ते पुष्पहार व श्रीफळ वाढवून करण्यात आले. या अभिमानास्पद क्षणाच्या वेळी पिंटू काळे, तेजस देपुरा, युवराज वाघ, केशव नारखेडे, सुरेश पाटील, भुषण देपुरा, शिरीष थोरात, ॲड. संतोष चव्हाण आणि मोठ्या संख्येने जळगांवकर उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.