---Advertisement---
विशेष जळगाव शहर

जळगावकरांनो रात्रीच्या वेळी शतपावली करतांना बिबट्यापासून सावध रहा…

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | २८ फेब्रुवारी २०२३ | जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात काही ठिकाणी बिबट्या दिसला किंवा बिबट्याने प्राण्यांवर हल्ला केल्याच्या बातम्या अधूनमधून वाचण्यात येतच असतात. मात्र जळगाव शहराच्या हद्दीवर बिबट्याचा वावर वाढला आहे. मेहरूणजवळच असलेल्या धानोर शिवारात बिबट्याने दोन वासरूंचा फडशा पाडल्याची घटना नुकतीच घडली. त्याआधी दोन दिवसांपूर्वीही बिबट्यांनी एका वासरूचा फडशा पाडला होता. परिसरातील शेतकर्‍यांना बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. नजिकच्या परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडतांना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

bibtya 2 jpg webp webp

मेहरुण जवळील धानोर शिवारात शेती सर्व्हे क्रमांक १७४ मध्ये हुसनोद्दीन पिरजादे यांचे शेत आहे. त्यात त्यांनी गोठा बांधला आहे. त्यात ४० गायी आहेत. गोठ्याला तारेचे कंपाउंडही केले आहे. मात्र, कंपाउंड तोडून बिबट्याने दि.२१ फेब्रुवारीला मध्यरात्रीनंतर वासरूचा फडशा पाडला होता. दि.२५ रोजीही पहाटेही वासरूवर हल्ला करीत त्याला उचलून नेले. तेथे त्याचा फडशा पाडला. सकाळी शेतकरी शेतात गेल्यावर त्यांना वासरू फडशा पाडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी वनरक्षक अजय रायसिंग व इतर सहकार्‍यांना सोबत घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.

---Advertisement---

धानोर शिवारात बिबट्याचा संचार वाढला असून, शेतकरी, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मोहाडी, महाबळ, रायसोनी नगर, गाडगेबाबा नगर, लांडोरखोरी परिसरानजीकच्या भागातील नागरिक रात्रीच्यावेळी शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यांनीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. वन विभागाकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी करूनही बंदोबस्त होत नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. केव्हा बिबट्या येईल व हल्ला करेल, याची भिती शेतकर्‍यांसह नागरिकांनाही आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---