जि.प.च्या लिपिकाने मागितली सव्वा दोन लाखांची लाच, महिन्याभराने कारवाई
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । तक्रारदाराच्या भावाला शिक्षण विभागात नोकरीसाठी परवानगी (अॅप्रुव्हल) देण्यासाठी जळगाव जिल्हा परीषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील वरीष्ठ लिपिक योगेश खोडपे याने दोन लाख 30 हजारांची लाच काही महिन्यांपूर्वी मागितली होती. काही महिन्यांपूर्वी आरोपीला संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणी एसीबीच्या अहवालात सिद्ध झाल्याने आरोपीला गुरुवारी अटक करण्यात आली. मागणीप्ररकणी जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सकाळी अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
टेबलावर नोटांचे वजन ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकावयचा नाही हा शासकीय कार्यालयात जणू अलिखीत नियम झाला आहे मात्र लाचखोरांविरोधात एसीबीने दंड थोपटले असून कुणीही शासकीय अधिकारी वा कर्मचारी कुठलेही शासकीय काम करण्यासाठी पैसे/लाच मागत असल्यास तातडीने एसीबीकडे तक्रार करावी, असे आवाहन एसीबीचे पेालिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांनी केले आहे. दरम्यान, जिल्हा परीषदेत लाचखोर वरीष्ठ लिपिकावर कारवाई झाल्यानंतर या प्रकारात कोण-कोण अधिकारी आणखी सहभागी आहेत हे पोलिस कोठडीतील चौकशीअंती स्पष्ट होणार असून भ्रष्ट अधिकार्यांच्या गोटात कारवाईने प्रचंड थरकाप उडाला आहे.
ही कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रभारी अपर अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस. पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सहा.फौजदार दिनेशसिंग पाटील, सहा.फौजदार सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, पोलीस नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, पोलीस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबलमहेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने केली.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- रेल्वेत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, इतका पगार मिळेल?