जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा परिषदेतील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे याला प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी डॉ. जयवंत मोरे याला जि.प.तून निलंबित करण्यात आले आहे.

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सोमवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. पोलिसांकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी ४ वाजता रंगेहात अटक केली होती.
तक्रारदाराच्या शासकीय कामासाठी आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. डॉ. जयवंत मोरेला तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते.