जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । जळगाव शहरातील श्रीकृष्ण नगरमधील ३१ वर्षीय तरुणाचा रेल्वेचा फटका लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. सागर अरुण सरोदे (वय ३०) असे मयत तरुणाचे नाव असून याबाबत जळगाव रेल्वे पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत असे की, जळगाव शहरातील श्रीकृष्ण नगरमधील राहणार सागर सरोदे याचा आज सकाळी शिवाजी नगर स्मशानभूमी जवळील रेल्वे पटरीवरील खांब नंबर ६ जवळ मृतदेह आढळून आला.
याबाबतची माहिती कळताच मित्रमंडळीची रेल्वे पोलीस स्टेशनला गर्दी जमली होती. दरम्यान सागर याचा मृत्यू नेमका रेल्वेचा फटका लागल्याने झाला की त्याने आत्महत्या केली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली.
हे देखील वाचा :
- Jalgaon : कुत्र्याच्या कारणावरून दगड, दांडक्याने मारहाण; तिघे जखमी
- जळगावात महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन
- Jalgaon : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे त्रुटीपुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन
- वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जळगावात पोलीस दलातर्फे हेल्मेट जनजागृती रॅली
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात २६ व्या राज्य संयुक्त परिषदेचा शुभारंभ