जळगाव लाईव्ह न्यूज | गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.मात्र अद्यापही जळगाव जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे पाऊस नसल्याने उन्हाचा चटका वाढला असून नागरिक हैराण झाले आहेत.काल रविवारी आर्द्रता ६० टक्क्यांवर पोहोचली. तसेच कमाल तापमान ३४.५ अंश असले तरी भासमान ३८ पेक्षा जास्त होते.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनची सक्रियता घटली आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दुसरीकडे पावसाने पाठ फिरविल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. कमाल तापमान ३५ अंश तर भासमान ३८ अंशांपर्यंत असल्याचे कारण आर्द्रता आहे.

आज २१ जुलै रोजी हवामान संमिश्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी उष्णता जाणवेल. सायंकाळी तुरळक पावसाची शक्यता आहे. २२ जुलैपासून कमाल तापमानात दोन ते तीन अंश घसरण तर २३ जुलै दरम्यान काही ठिकाणी तुरळक वादळासह हलक्या पावसाची शक्यता आहे, असे अंदाज हवामान अभ्यासक यांनी सांगितले.
आज राज्यातील या जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह संपूर्ण विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.








