वारं फिरलं ! जळगावचा पारा पुन्हा घसरला, थंडीचा कडाका वाढणार?

जानेवारी 17, 2026 2:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२६ । मागच्या दोन तीन दिवसात जळगाव शहारासह जिल्ह्यातील तापमानात वाढ दिसून आली. ढगाळ वातावरणामुळे ११ अंशाच्या घरात असलेले जळगावचे किमान तापमान १५ अंशावर जाऊन पोहोचले. सोबतच कमाल तापमानात देखील ३० अंशावर गेले. यामुळे थंडी अचानक कमी झाली आहे. मात्र आता तापमानात पुन्हा घसरण झाली.

tapman thandi

गुरुवारी जळगावचे किमान तापमान १५ अंश तर किमान तापमान ३०.५ अंश इतके नोंदविले गेले होते. मात्र शुक्रवारी जळगावचे किमान तापमान ३ ते ४ अंशांनी घसरल्याने १०.९ अंशावर पोहोचले. सोबतच कमाल तापमानातही घसरण झाली. दिवसाचे तापमान २९ अंशाखाली गेले. यामुळे रात्री थंडी जाणवली. मात्र दिवसा वातावरणातील गारवा कमी झाला असून दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका बसत आहे.

Advertisements

गेल्या काही दिवसापासून राज्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसानंतर सावट असल्याने जळगावसह अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली होती. यामुळे थंडीचा कडाका कमी झाला. आता ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण निवळताच राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होऊ लागले आहेत.

Advertisements

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आता रात्रीचे तापमान पूर्वीपेक्षा २ ते ३ अंशांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवेल, तर दुपारी उष्णता वाढेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now