जळगावात थंडीची तीव्रता आणखी वाढणार! आजपासून पुढचे चार दिवस असे राहणार तापमान?

जानेवारी 12, 2026 10:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यातील वातावरणातील बदलामुळे तापमानात चढउतार बघायला मिळत असून कधी तापमान अचानक खाली जात आहे तर कधी वाढ होत आहे. रविवारी जळगावचे किमान तापमान १०.८ अंशांवर होते. यामुळे रात्री आणि सकाळच्या वेळेतील थंडीचा कडाका कायम आहे. दरम्यान, थंडीची तीव्रता अजून काही अंशी वाढण्याची शक्यता आहे.

tapman thandi

उत्तरेकडून सलग येणाऱ्या या शीतलहरींमुळे जळगावात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः आज १२ ते १५ जानेवारीदरम्यान ढगाळ वातावरण व थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.या काळात किमान तापमान १० ते १२ अंशांदरम्यान तर कमाल तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस असे राहील.

Advertisements

पश्चिमी विक्षोभामुळे हवामानात थोडीशी अस्थिरता देखील आहे, म्हणजे रोज एकसारखेच तापमान राहण्याची शक्यता कमी आहे. दररोजच्या कमाल व किमान तापमानात सरासरी एक ते दीड अंशाची घसरण किंवा वाढ होण्याचा अंदाज आहे. असे असले तरी थंडीचा तडाखा अजून किमान आठवडा ते दहा दिवस कायम राहील. १३ जानेवारीनंतर जिल्ह्यात काहीसे ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे उष्णतेत घट होऊन थंडीचा जोर वाढेल. विशेषतः सकाळी आणि रात्री प्रभाव जाणवेल.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now