जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज ; वाचा आजचे हवामान?

एप्रिल 28, 2025 10:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२५ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन कायम असून, शनिवारी ढगाळ वातावरण झाल्याने तापमानात ४१ अंशापर्यंत आले होते. मात्र, रविवारी पुन्हा कोरडे वातावरण होऊन पारा ४३ अंशावर आला होता. यातच राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे त्यामुळे जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

WT

समुद्र किनाऱ्यावर वातावरणात झालेल्या बदलामुळे राज्यभरात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात सोमवारी २८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील उन्हाच्या काहिलीला काहीसा दिलासा मिळण्याची चिन्ह आहे.

जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून सूर्य आग ओकत आहे. तापमानात ४३ अंश सेल्सिअसच्या वर असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून जळगावकर होरपळून निघत आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत असून दुपारनंतर तर भाजून काढणारे ऊन पडत आहे. यातच दोन दिवसापूर्वी ढगाळ वातावरणामुळे जळगावचे तापमान ४१ अंशाच्या घरात आले होते. मात्र रविवारी कोरडे वातावरण होऊन पारा ४३ अंशावर गेला.

आज जिल्ह्यात दुपारी चार वाजेनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. आज २८ रोजी दुपारी ३० टक्के तुरळक पावसाची शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवसांत ढगाळतेसह पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणाऱ्या जळगावकरांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment