जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२५ । मागच्या काही दिवसापासून पाठ फिरविलेल्या पावसाने रविवारी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान आजपासून आगामी दोन दिवस जळगाव जिल्ह्यातील ठरावीक तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान विभागासह स्कायमेट, वेलनेस वेदर यासारख्या विविध हवामान संस्थांनी आगामी दोन दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने आज १४ जुलै रोजी पुन्हा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. जुलै महिन्यात जारी करण्यात आलेला हा सहावा ‘यलो अलर्ट’ आहे. मात्र मागच्या काही दिवसापासून पावसाने जळगाव जिल्ह्यात पाठ फिरवली. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला.

दरम्यान काल रविवारी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या पावसामुळे जळगाव शहरातील अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचलेली दिसून आली. काल रविवारी भुसावळ, रावेर, धरणगाव आणि चोपडा या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती.
दरम्यान आज १४ जुलै रोजी जिल्ह्यात ७० ते ७५ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून, यावेळी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील पावसाची स्थिती?
सध्या राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप घेतली आहे. २० जुलैनंतर राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जुलैच्या तिसर्या आठवड्यापासून पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. सध्या अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे मान्सून वारे कमकुवत झाले आहे. मान्सूनच्या पश्चिमी टोकाचेही काहीसे उत्तरेकडे सरकला आहे. बंगालच्या उपसागरात हवेचा दाब जुलै महिन्याच्या तिसर्या आठवड्यात अनुकूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. राज्यात चार दिवस ऑरेंज आणि रेल अलर्ट कुठेही दिला नाही.








