---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे जळगाव शहर

जळगावच्या रेल्वे उड्डाणपुलावरून ट्रक रिव्हर्स आला अन् झालं मोठं नुकसान.. घटनेचा VIDEO पहा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावरून ट्रक रिव्हर्स आल्याने मोठा अपघात घडला. यात या अपघातात ट्रकच्या मागे उभ्या 3 प्रवासी रिक्षा तसेच 4 दुचाकी पूर्णपणे दाबल्या जाऊन चक्काचूर होवून मोठे नुकसान झाले आहे. तसेच नाश्ता दुकानाचे देखील मोठे नुकसान झाले.

JLG

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र तिन्ही रिक्षा पूर्णतः निकामी झाल्या असून चालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शनिवारचा बाजार असल्याने पुलावर मोठी गर्दी होती. अचानक वेगाने मागे जाणारा ट्रक पाहून नागरिक भयभीत झाले. या अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

---Advertisement---

उड्डाणपुलावरून ट्रक अचानक उतारावर बंद झाला त्यानंतर चालक खाली उतरला असता याच दरम्यान ट्रक अचानक मागच्या बाजूला धावल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमध्ये एका रिक्षातील प्रवासी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उतारावरून हा ट्रक थेट मागच्या बाजूला येऊन वाहनांचे नुकसान करीत रस्त्यालगत असलेल्या नाश्ता दुकानांना उडवत झोपड्यांमध्ये घुसला. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून नुकसानग्रस्त चालकनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे..

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment