जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२४ । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच आता जळगाव विमानतळावरून जळगाव-पुणे विमानसेवा सोमवार, २७ मेपासून सुरु होत आहे. ही सेवा आठवड्यातून चार दिवस राहणार असून त्यानुसार तिकीट बुकिंगलादेखील सुरुवात झाली आहे.
खरंतर सुमारे साडेतीन वर्षांनंतर केंद्राच्या उड्डाण योजनेंतर्गत फ्लाय 91 कंपनीने जळगाव विमानतळावरून गोवा व हैदराबादसाठी गेल्या महिन्यात विमानसेवा सुरु केली आली. जळगाव येथून गोवा आणि हैदराबाद विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, पुणे विमानसेवा सुरू करण्याबाबतदेखील जळगावकरांची मागणी होती. दृष्टीने फ्लाय 91 कंपनीकडून हालचाली सुरू होत्या.
त्यासाठी ‘फ्लाय ९१’ या कंपनीने २४ व २६ मे रोजी ट्रायल फ्लाइटचे नियोजन केले आहे. त्यानुसार गोव्यावरून जळगावला तर जळगाववरून पुण्याला व पुण्यावरून जळगाव आणि नंतर गोव्याला विमानाने काल शुक्रवारी उड्डाण केले.
प्रवाशांचा प्रतिसाद पाहून विमान कंपनीने २७ मे ते २६ ऑक्टोबरदरम्यान गोवा-जळगाव-पुणे या विमान सेवेचे शेड्युल तयार केले आहे त्यानुसार तिकीट बुकिंगलादेखील सुरुवात झाली आहे. यात गोवा-जळगाव-गोवा ही सेवा दररोज तर पुणे-जळगाव-पुणे ही सेवा आठवड्यातील मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार अशी राहील.