⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचे संकेत ; वाचा काय आहे अंदाज?

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२४ । राज्यातील अनेक शहराचा तापमानाचा पारा वाढला आहे. जळगाव शहराचाही पाराही ३५ अंशांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे दुपारनंतर उन्हाचे चटका बसत असून उकाडा जाणवत आहे. काल मंगळवारी जळगावचे दिवसाचे तापमान ३५ अंशांपर्यंत तर रात्रीचे तापमान देखील १९ अंशांवर पोहोचले आहे. दरम्यान, जिल्ह्यात २४ मार्चपासून तापमान वाढून उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसात तापमानात मोठा बदल पाहायला मिळाले. मार्च महिना या उष्णेतेचा मानला जातो. मात्र या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानात घट झाल्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यासारखी थंडी जाणवली होती. परंतु त्यांनतर तापमानात पुन्हा बदल झाला. दरम्यान, हिमालयातील राज्यांमध्ये बर्फवृष्टीचे प्रमाण हळूहळू कमी होत असल्यामुळे राजस्थान, गुजरातकडून येणारे उष्ण वारे सक्रिय होणार आहेत.

मुंबई व कोकण किनारपट्टीकडे हे वारे काही अंशी सक्रिय असून, होळीनंतर या वाऱ्यांची दिशा बदलून खान्देशकडे सरकणार आहे. त्यामुळे होळीनंतर जळगाव जिल्ह्याच्या तापमानात चांगलीच वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांत जिल्ह्यात तापमान वाढून उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अलनिनोमुळे यंदाचा उन्हाळा राहणार कडक
आठ महिन्यांपूर्वी अलनिनो सक्रिय झाल्यामुळे त्याचा परिणाम मान्सूनवर झाला. अलनिनो अजूनही सक्रिय असल्याने यंदाचा उन्हाळा गेल्या काही वर्षाच्या तुलनेत अधिक कडक राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मे नंतर मात्र अलनिनोचा प्रभाव संपून, लालिनाची परिस्थिती निर्माण होणार आहे. एप्रिल-मे महिन्यात यंदा ४ ते ५ उष्णतेच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता