⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

दिलासादायक बातमी : उद्यापासून ढगाळ वातावरणाची शक्यता, वाचा आजचे तापमान..

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून तापमानाचा पारा ४३ अंशावर स्थिर आहे. जिल्हयात गेल्या काही दिवसापासून सूर्य आग ओकत आहे. काल शुक्रवारी जिल्ह्यात ४३.८ अंश सेल्सिअस एवढे तापमान नाेंदविले गेले. तर आज शनिवारी तापमानाचा पारा ४४ अंशावर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, उद्या रविवारपासून वातावारण ढगाळ हाेणार असून ढगाळ स्थितीत देखील तापमान उच्चांकावर असेल.

गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट असून उत्तरेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे उष्णतेच्या झळांनी नागरिकांना हैराण केले आहे.
गेल्या एप्रिल मधील शेवटच्या आठवड्यातील तापमानापेक्षा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमान १ अंशाने कमी झालेले दिसून येते. तरी देखील उष्णतेची लाट कायम आहे. उष्ण वाऱ्यामुळे सूर्यास्तानंतर शहरात रात्री १० वाजेपर्यंत उष्णतेच्या झळा जाणवत आहे.

दरम्यान, यंदा मार्च महिन्यातच जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशावर गेला होता. तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो ४६ अंशावर गेला. यंदा मे महिन्यात राहणारी उन्हाची तीव्रता एप्रिल (April) महिन्यातच दिसून आली. त्यामुळे मे महिना कसा जाईल याची चिंता आता जळगावकरांना लागली आहे.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
१० वाजेला – ३८ अंश
११ वाजेला – ४१
१२ वाजेला – ३१ अंश
१ वाजेला- ४२ अंशापुढे
२ वाजेला – ४२ अंश
३ वाजेला – ४३ अंशापुढे
४ वाजेला – ४२ अंश
५ वाजेला – ४२ अंश
६ वाजेला – ४० अंश
७ वाजेला – ३७ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३६ अंशावर स्थिरावणार.