---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

जळगावात ढगाळ वातावरणामुळे उकाडा पुन्हा वाढला, आज जिल्ह्यात पूर्वमाेसमी पावसाची शक्यता

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । मान्सूनच्या आगमनापूर्वीच राज्यातील अनेक भागात पूर्वमाेसमी पावसाचे संकेत असल्याने आणि ढगांनी गर्दी केल्यामुळे तापमानाचा पारा घसरला आहे. तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तापमानात घट झाली आहे. दरम्यान, जळगावात उन-सावल्यांचा खेळ सुरु असून गुरुवारी तापमान पुन्हा चाळिशीपार गेले हाेते. काल तापमान ४०.८ अंशांवर असताना ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली हाेती.

tapman 3

जळगावात पारा काही दिवसापासून घसरला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील पारा तब्बल ४५ अंशावर गेला होता. तर जिल्ह्यातील भुसावळ येथे राज्यातील सर्वाधिक ४७ अंशावर अधिक तापमानाची नोंद झाली होती. सकाळी १० वाजेपासूनच तापमानाचा पारा ४० अंशावर जात होता. त्यामुळे असह्य उकाडा जाणवत होता. पूर्वमोसमी वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.

---Advertisement---

दरम्यान गेल्या काही दिवसापासून पारा ४० अंशापर्यंत राहणार पारा गुरुवारी ४०.८ अंशांवर गेला होता. तसेच काल दिवसभर अधूनमधून असे ढगाळ वातावरण हाेते. तरीदेखील उकाड्यात प्रचंड वाढ झाली हाेती. दरम्यान, आज शुक्रवारपासून जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पूर्वमाेसमी पावसाच्या सरी काेसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
११ वाजेला – ३४ अंश
१२ वाजेला – ३६ अंश
१ वाजेला- ३७ अंशापुढे
२ वाजेला – ३८ अंश
३ वाजेला – ३९ अंशापुढे
४ वाजेला – ३९ अंश
५ वाजेला – ३९ अंश
६ वाजेला – ३८ अंश
७ वाजेला – ३६ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३४ तर रात्री ९ वाजेला ३३ अंशावर स्थिरावणार.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---