⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | हवामान | जळगावचा पारा २ अंशाने घसरला, पण…

जळगावचा पारा २ अंशाने घसरला, पण…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२२ । मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय. वाढत्या तापमानाने जळगावकर हैराण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी ताशी २५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तापमान दाेन अंशांनी घसरून ४३.५ अंशांवर आले. तर गेल्या दोन दिवसापासून राज्यातील सर्वाधिक तापमान असलेल्या भुसावळ शहरातचे कमाल तापमान ४५.१ अंशपर्यंत नोंदविले गेलेय. परंतु, उष्णतेच्या लाटेची तीव्रता तेवढीच जाणवत हाेती.

गेल्या पंधरवड्यापासून उष्णतेच्या लाटेत हाेरपळून निघालेल्या जळगावकरांसाठी मे महिन्यातील प्रत्येक दिवस उष्णतेची नवीन आव्हाने घेऊन येत आहे. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचा पारा ४० अंशावर जात असलयाने अंगातून घामाच्या धारा निघत आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान भुसावळात नोंदविले गेलं.

सोमवार आणि मंगळवारी सलग दोन दिवस शहराचे कमाल तापमान ४७ अंशांच्या पुढे असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. यानंतर बुधवारी त्यात ०.९ अंशांची घट झाली होती. तर काल गुरुवारी पुन्हा दोन अंशाने तापमान घटले. काल सायंकाळी जिल्ह्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा २ अंशांनी घटला आहे. गुरूवारी तापमान कमी असले तरी वेगाच्या वाऱ्यामुळे उष्णतेच्या झळा जाणवत होत्या. रात्रीचा पारा ३० अंशांवर स्थिर असल्याने दिवसासाेबतच रात्रीचा उकाडा असह्य करणारा ठरत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.