⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

Temperature : उन्हाचा तडाखा : सकाळी ८ नंतरच उष्णतेची धग, असे असेल आजचे तापमान

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२२ । गेल्या पंधरवड्यापासून उष्णतेच्या लाटेत हाेरपळून निघालेल्या जळगावकरांसाठी मे महिन्यातील प्रत्येक दिवस उष्णतेची नवीन आव्हाने घेऊन येत आहे. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचा पारा ४० अंशावर जात असलयाने अंगातून घामाच्या धारा निघत आहे. काल बुधवारी तापमानाचा पारा किंचित एक ते दीड अंशाने घसरलेला दिसून आला. काल भुसावळचे तापमान ४६.३ अंशांवर होते तर जळगावचे ४५.२ अंशावर होते. दरम्यान, उन्हाच्या झळा नसल्या तरी उष्णतेची धग मात्र कायम होती.

बंगालचा उपसागर व अंदमान बेटाजवळ समुद्रात असलेल्या असनी चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम राज्यातील उष्णतेच्या लाटेवर हाेत आहे. विदर्भ व खान्देशात उष्णतेची लाट अधिक तीव्र हाेत आहे. समुद्रातील वादळामुळे हवेतील बाष्प शाेषले जात असल्याने उत्तर महाराष्ट्रात आर्द्रता घटली आहे. हवेतील काेरडेपणा वाढल्याने उष्ण वारे लाट अधिक तीव्रता वाढवत आहेत. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात एरवी दुपारी १२ ते १ वाजेनंतर जाणवणारी उष्णता सकाळी १० वाजेपासूनच चटका देत आहे.

जिल्ह्यात गेला एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे यंदाचा मे महिना कसा जाणार याची चिंता जळगावकरांना सतावत आहे. मात्र, देखील चांगलेच हिट ठरताना दिसतोय. जळगाव जिल्ह्यात दरवर्षी तापमान जास्तच असते. परंतु, गेल्या काही वर्षात जळगावातील तापमान 46 अंशाच्या वर गेले नव्हते. या वर्षी मात्र 47.2 अंशसेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.

वाढत्या उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. ज्यांना घराबाहेर पडणे गरजचे आहे असे नागरिक डोक्याला आणि कानाला कापड बाधून बाहेर पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. सायंकाळच्या वेळेस देखील तापमानाचा पारा ४० ते ४१ अंश पर्यंत राहत असून उष्ण वाऱ्यामुळे उष्णतेच्या झळा जाणवत आहे.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
१२ वाजेला – ३९ अंश
१ वाजेला- ४१ अंशापुढे
२ वाजेला –४२ अंश
३ वाजेला – ४३अंशापुढे
४ वाजेला – ४४ अंश
५ वाजेला – ४४ अंश
६ वाजेला – ४३ अंश
७ वाजेला – ४१ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३९ तर रात्री ९ वाजेला ३७ अंशावर स्थिरावणार.