⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | हवामान | Heat Wave : जळगावकरांनो काळजी घ्या, भुसावळ @४७.२, असे असणार आजचे तापमान

Heat Wave : जळगावकरांनो काळजी घ्या, भुसावळ @४७.२, असे असणार आजचे तापमान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२२ । यंदाचा उन्हाळा जळगावकरांना चांगलाच हैराण करणारा ठरतोय. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील भुसावळ शहराचे तापमान ४७.२ इतके नोंदविण्यात आल्याने अंगाची लाहीलाही झाली. यापूर्वी सोमवारी भुसावळ येथे ४७.२ अंश सेल्सिअस इतके होते. दरम्यान, वाढत्या तापमानाने जनजीवनावर परिणाम झाला असून १२ मे पर्यंत उच्चांकी तापमान कायम राहील, असा आयएमडीचा अंदाज आहे.

जिल्ह्यात गेला एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे यंदाचा मे महिना कसा जाणार याची चिंता जळगावकरांना सतावत आहे. मात्र मे महिन्यात तर उष्णतेच्या लाटेचा कहर सुरु आहे.  जळगाव जिल्ह्यात दरवर्षी तापमान जास्तच असते. परंतु, गेल्या काही वर्षात जळगावातील तापमान 46 अंशाच्या वर गेले नव्हते. या वर्षी मात्र 47.2 अंशसेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात यंदा वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे पाहायला मिळत असून जिल्ह्यातील केळी बागांना देखील उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. ज्यांना घराबाहेर पडणे गरजचे आहे असे नागरिक डोक्याला आणि कानाला कापड बाधून बाहेर पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. सायंकाळच्या वेळेस देखील तापमानाचा पारा ४० ते ४१ अंश पर्यंत राहत असून उष्ण वाऱ्यामुळे उष्णतेच्या झळा जाणवत आहे.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
१० वाजेला – ४०अंश
११ वाजेला – ४१
१२ वाजेला – ४१ अंश
१ वाजेला- ४२ अंशापुढे
२ वाजेला – ४३ अंश
३ वाजेला – ४४ अंशापुढे
४ वाजेला – ४४ अंश
५ वाजेला – ४४ अंश
६ वाजेला – ४३ अंश
७ वाजेला – ४२ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३९ तर रात्री ९ वाजेला ३८ अंशावर स्थिरावणार.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.