---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावकरांना दिलासा, ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट, आज कसं राहणार हवामान?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२४ । गेल्या दिवसापासून राज्यासह जळगाव जिल्ह्यातील तापमानात बदल पाहायला मिळतोय. सध्या राज्यावर अवकाळी पावसाचं सावट असल्याने जळगावसह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे तापमानात बदल पाहायला मिळत आहे. दरम्यान, जळगावातील तापमानात घट दिसून आलीय. दोन दिवसापूर्वी ४० अंशापर्यंत असलेलं तापमान काल बुधवारी ३८ वर आले. सध्या हवेत गारवा वाढल्यामुळे जळगावकरांची उकाड्यापासून सूटका झाली. आज जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे.

tapman 3

दरम्यान हवामान खात्याने जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविली असून १४ एप्रिलपर्यंत तापमानाचा पारा ३८ अंशाखाली राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जिल्ह्यात पावसाचा अंदाज असला तरी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली नाहीय. दोन दिवसापूर्वी जिल्ह्यातील काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसल्या होती. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

---Advertisement---

सध्या जिल्ह्यात ऊन-सावलीचा खेळ पाहायला मिळतोय. ढगाळ वातारणामुळे उन्हाचा पारा घसरला आहे. वातावरणात दुपारपर्यंत गारवा जाणवत आहे. मात्र दुपारनंतर सायंकाळपर्यंत उन्हाचा चटका बसत आहे. आज रात्रीच्या वेळी जोरदार वारे वाहत असल्याने गारवा अधिकच वाढला होता. जिल्ह्यात आज दि.११ व १२ रोजी पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर १४ एप्रिलपर्यंत पारा ३८ अंशापर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे.

काय आहे अंदाज?
दि.११-विजांचा कडकडाटासह पाऊस
दि.१२-विजांचा कडकडाटासह पाऊस
दि.१३-अंशतः ढगाळ आकाश
दि.१४-अंशतः उगाळ आकाश
दि.२५-अंशतः ढगाळ आकाश निर्माण झाला,

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---