⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

जळगावकर होणार उकाड्याने हैराण ; आजपासून तापमानाचा पारा वाढणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 10 मार्च 2024 । राज्यासह जळगावातील वातावरण बदल पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी दिवसाचा ३१ अंश सेल्सिअसखाली आणि रात्रीचा पारा ११ अंश सेल्सिअसवर आल्याने उन्हाळ्यात थंडी जाणवली. मात्र आता कमाल आणि किमान तापमानाचा पारा वाढला असून सध्या उन्हाचे चटके चांगलेच झोंबत आहेत. आज १० मार्चपासून तापमान काही प्रमाणात वाढेल.

दरम्यान, गेल्या महिन्याच्या शेवटची राज्यासह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. यानंतर तापमान ३८ अंशापर्यंत गेले होता. परंतु ३ मार्च पासून तापमानात मोठी घट दिसून आली. यामागील कारण म्हणजेच हिमालयालगतच्या राज्यांमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर जळगावातील तापमानात मोठी घट नोंदविली गेली होती. ३८ अंशावर असलेला पारा ३१ अंशाखाली गेला होता. यामुळे उन्हाच्या झळांपासून जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला होता.

मार्च महिन्यात जळगाव शहरात उन्हाची तीव्रता वाढते. मात्र, ५ मार्च रोजी जळगावचे जळगावचा किमान पारा ११.८ अंशापर्यंत खाली आला होता. सहा वर्षानंतर पहिल्यांदाच मार्च महिन्यात जळगावचा किमान पारा इतका घसरला होता. यामुळे रात्रीचा आणि पहाटेच्या वेळेचा थंडीचा कडाका वाढला होता. जळगावकरांनी मार्चमध्ये नोव्हेंबर सारख्या थंडीची अनुभूती घेतली.

परंतु आता तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. शनिवारी जळगावचे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तर किमान तापमान १५. ४ अंशावर गेला आहे. यामुळे दिवसा उन्हाचे चटके बसत असून आजपासून तापमानात आणखी वाढ होणार आहे. यानंतर १० ते १५ एप्रिल दरम्यान कमाल तापमानात दोन ते तीन डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे.