---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

जळगाव गारठले : तापमान ७ अंशावर, हुडहुडी आणखी वाढणार!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । गेल्या दोन दिवसांपासून थंडी पुन्हा परतली असून नागरिकांना हुडहुडी भरली आहे. जळगाव जिल्ह्यातील किमान तापमान मंगळवारी सकाळी ७ अंश नोंदविले गेले. थंडीचा कडाका आणखी वाढणार असून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

thandi tempreture

एरव्ही मकर संक्रांतीच्या सणानंतर दूर पळणारी थंडी गेल्या काही वर्षापासून संक्रांतीनंतरच वाढत आहे. नागरिक स्वेटर, उबदार टोपी कपाटात ठेऊन देण्याच्या तयारीत असतानाच ते पुन्हा बाहेर काढावे लागत आहे. गेल्या आठवड्यात थंडी परतेल असे वाटत असताना सोमवारपासून पुन्हा थंडी वाढू लागली आहे. रविवारी तर पाकिस्तानमध्ये आलेल्या धुळीच्या वादळाने जळगावात धूळ निर्माण केली होती.

---Advertisement---

जळगावचा पारा अचानक कमी झाला असून किमान १५ अंश असलेले तापमान ७ अंशावर येऊन पोहोचले आहे. नागरिकांची हुडहुडी वाढली असून दिवसा देखील थंडी जाणवत आहे. पारा खाली आल्याने नागरिकांनी विशेषतः वृद्ध, अस्थमा रुग्ण, लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---