जळगाव जिल्हाहवामान

जळगावकरांना दिलासा! ४५ अंशांच्या होरपळीनंतर पारा घसरणार; ‘या’ तारखेनंतर मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम असून ४४ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानात जळगावकर होरपळून निघत आहे. अशातच जळगावकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आगामी काही दिवसांत जिल्ह्याच्या तापमानात लक्षणीय घट होऊन पारा ३९ अंशांपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कारण २५ मे नंतर जिल्ह्यात जोरदार मान्सूनपूर्व पावसाचे (Pre-Monsoon) आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे भीषण उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यात पुढील सात दिवस पावसाची शक्यता कमी असली, तरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जळगावकरांची पावसाचीही प्रतीक्षा संपणार आहे. २५ मे नंतर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जिल्ह्यात चांगल्या मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तापमानात होणार घट

राजस्थानच्या वाळवंटी भागाकडून येणाऱ्या या अतिउष्ण वाऱ्यांमुळे जिल्हा होरपळून निघाला होता. मात्र, आता पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची स्थिती झाली आहे. जळगावकडे येणारे वारे आता थेट अरबी समुद्राकडून येण्याची शक्यता आहे. या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आणि अंशतः ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा वेगाने खाली येईल.

आगामी पाच दिवसांतील तापमानाची स्थिती…
दिनांक, तापमानाची स्थिती

१८ मे : ४१ अंश
१९ मे : ४० अंश
२० मे : ३९ अंश
२१ मे : ३९ अंश
२२ मे : ३९ अंश

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button