महाराष्ट्रराजकारण

जळगाव हादरले ! पोलिसात तक्रार दिली म्हणून माय-लेकाला कारने उडविले…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ जानेवारी २०२३ | दुचाकी, घरावर दगडफेक करुन त्रास देणार्‍या तरुणाविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. या तक्रार दिल्याचा राग आल्याने दोघांनी तक्रार देऊन घरी निघालेल्या माय-लेकाला कारने उडविल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे ४ ते ४.३० वाजेच्या सुमारास शिवाजी नगर उड्डाणपुलावर घडली. या अपघातात माय-लेक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (crime in jalgaon)

शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील शिवशंकर कॉलनीत अतुल रविंद्र सोनवणे हा तरुण वास्तव्यास आहे. त्यांच्या गल्लीत एकाने सन २०१७ मध्ये सोनवणे याच्या बहिणीला दुचाकीने कट मारुन शिवीगाळ केली होती. याचा जाब विचारण्यास गेलेल्या सोनवणे कुटूंबियांना त्या तरूणाने मारहाण केली होती. याप्रकरणी १५ जानेवारी २०१७ रोजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर १६ मे २०२१ रोजी त्या तरूणाने पुन्हा सोनवणे याच्या घरासमोर येवून जोरजोरात हॉर्न वाजवून शिवीगाळ करत होता. याची देखील तक्रार दिली होती. त्याचा राग आल्यामुळे ७ मे रोजी त्याने सोनवणे याच्याशी भांडण करून त्याच्या बहिणींना मारहाण करीत जखमी केले होते. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल होवून त्याची केस न्यायालयात न्याप्रविष्ठ आहे.

मंगळवारी दुपारच्या सुमारास तो तरूण पुन्हा हा सोनवणे याच्या घराच्या कंपाऊंटच्या गेटला लाथा मारीत होता. त्याठिकाणी लावलेल्या वाहनांना दगड मारून तुमच्यातल्या एखाद्याचा खून करुन टाकेल, अशी धमकी त्याने दिली. याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस त्याठिकाणी आले असता, तो तरूण तेथून पळून गेला. पोलिस माघारी गेल्यानंतर तो पुन्हा येवून गोंधळ घालू लागला. अखेर पोलिसांनी रात्री त्याला ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात नेले.

अखेर मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अतुल हा आई शशिकला यांच्यासोबत तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात आला. नंतर तक्रार देवून बुधवारी पहाटे ४ वाजता अतुल हा आईला घेवून दुचाकीने घराकडे निघाला. शिवाजी नगर उड्डाणपुलावरुन उतरत असताना अचानक तो तरूण त्याच्या साथीदारासह कारमधून (एमएच.३०.एएफ.८७३४) समोरून आले आणि अतुल याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मायलेक रस्त्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी जीवेठार मारल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन जणांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button