जळगाव जिल्हा

जळगाव-पुणे ट्रॅव्हल्स रस्त्यात नादुरुस्त, पहाटे ३ पासून प्रवाशांचे हाल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ । जळगाव शहरातून पुणे जात असलेली संगीतम ट्रॅव्हल्सची (Jalgaon Pune Sangitam Travels) एक बस पहाटे ३ वाजेच्या सुमारास अहमदनगरजवळ नादुरुस्त झाली. पहाटेची वेळ अन् त्यात पावसाचे दिवस असतांना देखील सकाळी ६ पर्यंत प्रवाशांची कोणतीही पर्यायी सोय करण्यात आली नाही. दरम्यान, चालक देखील उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती प्रवाशांनी जळगाव लाईव्हला दिली.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील प्रवाशांना घेऊन संगीतम ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एमएच.१९.वाय.९२२२ ही रविवारी रात्री पुणे जाण्यासाठी निघाली होती. पहाटे ३ वाजेच्या सुमारास कोलार जि. अहमदनगर जवळ बस नादुरुस्त झाली. रस्त्यावरच बस बंद पडल्याने प्रवाशी मदतीसाठी चालकाला विचारणा करू लागले. पहाटे ३ वाजेपासून ६ वाजेपर्यंत कोणतीही मदत किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही.

चालकाकडून कोणतेही ठोस उत्तर किंवा प्रतिसाद प्रवाशांना मिळत नाही. तसेच मालकाचा देखील संपर्क क्रमांक दिला जात नसल्याने प्रवाशी संतप्त झाले आहे. पहाटेची वेळ असल्याने प्रातविधी, लघु शंकेला जाण्यासाठी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. दरम्यान, ‘जळगाव लाईव्ह टीम’ने संगीतम ट्रॅव्हल्सच्या हेल्पलाईनशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Related Articles

Back to top button