⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना मिळणार दिलासा ; वाचा हवामान खात्याचा अंदाज..

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२३ । गेल्या अनेक दिवसापासून उकाड्याने जळगावकर अक्षरशः हैराण झाले असून दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.उकाड्यापासून हैराण झालेले नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच हवामान खात्याने जळगावकरांना दिलासा देणारा अंदाज वर्तविला आहे.

आगामी आठवड्यात जळगावरकरांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यासह जळगाव जिल्ह्यात 29 आणि 30 मे रोजी मान्सूनपूर्व पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच जिल्ह्यात 10 ते 15 जून दरम्यान, मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

सध्या जळगावमधील तापमानात कमालीचा बदल जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 43 अंशाच्या घरात असलेलं तापमानात घट झालेली दिसून येत आहे. काल गुरुवारी जळगाव मधील 25 मे रोजी कमाल तापमान 41.2अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 27.6 अंश सेल्सिअस होते.

आज देखील तापमान स्थिर राहण्याचा अंदाज असून दुपारी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झालेली पाहायला मिळतेय. येत्या काही दिवसात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावण्याची शक्यता

असह्य हैराण करून सोडलेल्या जळगावकर मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. अशातच हवामान खात्याने जिल्ह्यात 10 ते 15 जून दरम्यान, मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात 2019 ते 2022 या चार वर्षात एकूण सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला. मात्र यंदा मान्सूनवर अलनिनोचा प्रभाव राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.