---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र

जळगावकरांनो सावधान ! जळगाव महापालिकेमुळे तुमचा जीव येतोय धोक्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२३ । एखाद्या शहराच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवायचं असेल तर चौका चौकामध्ये सिग्नल सिस्टीम अद्यावत असणे अतिशय गरजेचे आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जळगाव शहरातील अर्ध्याहून जास्त सिग्नल बंद आहेत. पर्यायी नागरिकांना या सुविधे शिवाय प्रवास करावा लागत असून छोटेमोठे एक्सीडेंट किंबहुना अपघात होण्याच्या संख्या वाढल्या आहेत. सिग्नल रेपायरिंगची हि संपूर्ण जवाबदारी महापालिका प्रशासनाकडे असते मात्र महापालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे.

thambnail single 1 jpg webp webp

शहरात सायंकाळच्या किंवा सकाळच्या वेळी जेव्हा पीक हावर (सर्वाधिक वर्दळीचा वेळ) असतो अशावेळी बहुतांश ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याचे पाहायला मिळते. याचे कारण म्हणजे सिग्नल सिस्टीम काम करत नसणे. आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बेंडाळे महिला कॉलेज, कोर्ट चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, नेरी नाका या ठिकाणी सिग्नल सिस्टीम आहेत मात्र सिस्टीम बंद आहेत. शहरातील ३ ते ४ चौक सोडले तर इतर सर्व ठिकाणी ट्रॅफिकची मोठी समस्या नागरिकांना पाहायला मिळत आहे.

---Advertisement---

या खराब सिस्टीम मुळे शहराची व्यवस्था अतिशय खराब झाली आहे. शहरातील मुख्य आणि आजूबाजूच्या रस्त्यांचे फुटपाथ आणि रस्त्यावर अतिक्रमण झालं असून पार्किंगचाही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अतिक्रमण झाले आहे.

जळगाव शहरात नसलेल्या सिग्नल सिस्टीममुळे मोठ्या प्रमाणावर अपघाताच्या संभावना वाढल्या आहेत. ते मोठे अपघात होत असतात त्यातच आधीच नागरिक सिग्नल नियम पालन करत नाहीत. त्यात सिग्नल बंद असल्याने सर्रासपणे कोणीही कशीही गाडी चालवतो. जळगाव शहरात एकूण 19 चौकांमध्ये सिग्नल लावण्यात आले आहेत. मात्र तीन ते चार सिग्नल सोडल्यास कुठेही सिग्नल नाहीत.महापालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी नागरिक करत आहेत.

जळगाव शहर महानगर पालिकेला वहातुक विभाग दर महिन्याला एक रक्कम अदा करत असतो. कारवाई केलेल्या एकूण रकमेतील ४० टक्के असते. मात्र मनपा प्रशासन कोणतीही डागडुजी किंवा दुरुस्ती करण्यास तयार नाहीये.

६७ पोलीस घेतात अथक परिश्रम
जळगाव शहरातील ट्राफिक कमी करण्याचे अथक काम जळगाव शहरातील ६७ ट्राफिक पोलीस कर्मचारी करत असतात.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---