⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

जळगावातील नवीन बी.जे. मार्केटमधील प्रिंटींग प्रेसला भीषण आग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२३ । जळगाव शहरातील नवीन बी.जे. मार्केटमधील एका प्रिंटींग प्रेसला भीषण आग लागल्याची घटना आज गुरुवारी दुपारी घडली. या आगीत दुकानातील छापाई मशीनरीसह कागद जळून नुकसान झाले आहे.

जळगाव शहरातील नवीन बी.जे. मार्केट येथील तिसऱ्या मजल्यावर विकास नारखेडे यांच्या मालकीचे अमोल इंटरप्रायझेस नावाचे प्रिंटींग प्रेस दुकान आहे. आज गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली.

या आगीत दुकानातील छापाई मशीनरीसह कागद जळून नुकसान झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. यावेळी मार्कटमधील नागरीकांची मोठी धावपळ उडाली. शार्टसर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.