Jalgaon : निवडणुकी आधीच राष्ट्रवादीत(अ.प) फूट ; महानगराध्यक्ष अभिषेक पाटलांचा तडकाफडकी राजीनामा..

डिसेंबर 30, 2025 12:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२५ । जळगाव महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठी फूट पडली आहे. जळगावचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपला पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने अजित पवार गटात खळबळ उडाली.

abhishek patil

महापालिका निवडणुकीत जागा लढण्यावरून जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासोबत मतभेद झाल्याने राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीय.

Advertisements

महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी राजीनामा दिल्याचे यावर त्याला दुजारा दिला असून पक्ष कार्यालयात राजीनामा दिल्याचे सांगितलं. दरम्यान महापालिका निवडणूक लढवून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये दुफळी वाद निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे

Advertisements

एकीकडे जळगाव महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उरलेला असतानाही सत्ताधारी महायुतीमधील (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाही. एकीकडे भाजप ५० जागांवर ठाम आहे, तर दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) २५ जागांहून कमी घेण्यास तयार नाही. या वादात राष्ट्रवादीसाठी जागा सोडणार कोण? असा प्रश्न निर्माण झाल्याने महायुतीचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now