चिंताजनक ! जळगावमध्ये दुपारी १.३० पर्यंत अवघे ‘इतके’ टक्के मतदान

जानेवारी 15, 2026 3:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२६ । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज शहरातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू आहे. दुपारी १.३० वाजेपर्यंत एकूण २२.४९ टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

election 1

मतदानाच्या सुरुवातीच्या दोन तासात ५.५ टक्के मतदान झाले होते. यानंतर सकाळी ११:३० वाजेपर्यंत शहरात १३.३९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासांत (दुपारी १:३० पर्यंत) मतदानाचा वेग काहीसा वाढला असून, या दोन तासांत ३९,९४३ नवीन मतदारांनी केंद्रावर हजेरी लावली.

Advertisements

दुपारी १:३० पर्यंत केवळ २२.४९ टक्के मतदान असून एकूण ९८,६४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ५४,१३२ पुरुष तर ४४,५०९ महिलांचा समावेश आहे. थंडी ओसरल्यानंतर मतदानासाठी मोठ्या रांगा लागतील असा अंदाज होता, मात्र अद्यापही मतदान केंद्रांवर फारशी गर्दी दिसून येत नाहीये. आता शेवटच्या टप्प्यात म्हणजेच दुपारी ३:३० ते ५:३० या वेळेत मतदानाचा टक्का किती वाढतो, यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल. प्रशासनाकडून मतदारांना घराबाहेर पडण्याचे आवाहन वारंवार केले जात असून, सायंकाळच्या सत्रात नोकरदार वर्ग आणि तरुणांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now