जळगाव महापालिका निवडणूक : सकाळी ११.३० वाजेपर्यंत १३.३९ टक्के मतदान

जानेवारी 15, 2026 1:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२६ । राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकींसाठी आज मतदान पार पडत आहे. जळगावमध्ये सकाळच्या ११.३० वाजेपर्यंत १३.३९ टक्के मतदार झाले आहे.

election jpg webp

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांपैकी १२ जागा बिनविरोध निवडून झाले असून उर्वरित ६३ जागांसाठी आज सकाळी ७.३० वाजेपासून मतदान पार पडत आहे. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ५.५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. सुरुवातीच्या दोन तासांत जळगावकरांनी उत्साह दाखवला नसला तरी यांनतर मतदानाचा काहीसा टक्का वाढलेला दिसून आला. ११.३० वाजेपर्यंत १३.३९ टक्के मतदान झाले.

Advertisements

यामध्ये एकूण ५८,६९८ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. यामध्ये ३३,२५७ पुरुष आणि २५,४४१ महिला मतदारांचा समावेश आहे. दुपारपर्यंत मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now