जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२४ । जळगाव महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी बुधवारी प्रशासनात भाकरी फिरवल्या. खास करून नगररचना, बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागात मोठे फेरबदल केले.

महापालिकेच्या कामकाजात गतिमानता येण्यासाठी १० अधिकाऱ्यांच्या कार्यभारात बदल करण्यात आला आहे. रचना सहायक जयंत शिरसाठ यांच्याकडे सहायक नगररचनाकार, पाणीपुरवठा विभागाचे कामकाज सांभाळून नगररचना विभागाचा अतिरिक्तचा कार्यभार देण्यात आला आहे. नगररचना विभागातील उपआवेक्षक मनोज वन्नेरे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग प्र.क. ७ व ८, अतिक्रमण कार्यभार देण्यात आला आहे.
सर्वेअर विजय मराठे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग प्र.क्र. १५,१८,१९ सह नगररचना विभागातील मूळ कार्यभार सांभाळून अतिरिक्तचा कार्यभार देण्यात आला आहे. स्थापत्यचे कनिष्ठ अभियंता विशाल सुर्वे यांच्याकडे अमृत ०.२ मलनिस्सारण प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. यांत्रिकी विभागाचे कनिष्ठ अभियंता दीपक चौधरी यांच्याकडे विद्युत व यांत्रिकीचे कामकाज सांभाळून मलनिस्सारण योजना, मल प्रकल्पाचा अतिरिक्तचा कार्यभार अतिक्रमण निर्मूलन विभागातील लिपीक संजय बन्सी पवार यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक पदाचा अतिरिक्तचा पदभार देण्यात आला आहे