जळगाव शहर
जळगाव मनपाचे आयुक्त कुलकर्णी 10 ऑगस्टपर्यंत रजेवर
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी हे कौटुंबिक कामासाठी 10 ऑगस्टपर्यंत रजेवर गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत मनपाच्या आयुक्त पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
आयुक्त कुलकर्णी हे 30 जुलैपासून रजेवर आहेत. तर 11 ऑगस्ट रोजी ते परतणार आहेत. दरम्यानच्या काळात महापालिकेचे प्रशासकीय कामकाज जिल्हाधिकारी राऊत यांच्या नेतृत्वात सुरू राहणार आहे. कुलकर्णी यांची रजा मंजुर झाल्याचा शासनाचा आदेश शुक्रवारी मनपाकडे दुपारी प्राप्त झाला आहे.