जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२४ । जळगावकरांची जळगाव-मुंबई विमानसेवेची प्रतीक्षा अखेर संपली. गोवा, हैदराबाद, पुणे या विमानसेवेनंतर आता जळगाव विमानतळावरून जळगाव-मुंबई विमानसेवेला आज गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. ‘अलायन्स एअर’ या विमान कंपनीकडून ही सेवा पुरविली जाणार असून भाडेसुध्दा कमी केले आहे. या विमानसेवेच्या तिकिटाचा दर २,१०० रुपये ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सुद्धा या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. व्यापारी आणि उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
उडान ५.० योजनेअंतर्गत मुंबई जळगाव-मुंबई या विमानसेवेला मंजुरी मिळाली आहे. तिकीट बुकिंगदेखील ‘अलायन्स एअर’ कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू केले आहे. सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस सेवा व तिकीट दर ३,४४० रुपये असे जाहीर केले होते. आता मात्र मंगळवार, गुरुवार व शुक्रवार अशी तीन दिवस सेवा व तिकिटाचे दर २ हजार १०० रुपये केले आहेत.
परंतु सुरवातीला तिकिटाचे दर जास्त व सायंकाळची वेळ सुविधेची नसल्याने प्रतिसाद नसल्याची माहिती तिकीट बुकिंग एजंट यांच्याकडून सांगण्यात आली. असे आहे. त्यामुळे आता या वेळेत व तिकीट दरात देखील कपात करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव-मुंबई जाणाऱ्या प्रवांशांसाठी ही महत्त्वाची बाब आहे.
असे आहेत वेळापत्रक
मंगळवारी सायंकाळी ६.३५ वाजता मुंबईहून विमान निघेल आणि ७ वाजून ५५ ला जळगावला पोहोचेल. जळगावहून ८ वाजून २० मिनिटांनी मुंबईला निघेल अन् ९ वाजून ३५ ला पोहोचेल. गुरुवार व शुक्रवारी विमान मुंबईवरून सायंकाळी ६:४५ वाजता जळगावकडे निघेल. जळगावला रात्री ८:०५ ला पोहोचेल. तर रात्री ८:३० वाजता मुंबईकडे विमान निघेल आणि ९:४५ वाजता मुंबईला पोहोचेल.