---Advertisement---
जळगाव शहर

जळगाव एमआयडीसीतील गुरांच्या मार्केटजवळील डीपीला आग

jalgaon midc dp fire
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । जळगावातील एमआयडीसी परिसरातील गुरांच्या बाजार जवळील इलेक्ट्रिक डीपीला आज रविवारी दुपारी अचानक आग आल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन बंबाने ही आग विझविली असून पुढील अनर्थ टळला.

jalgaon midc dp fire

जळगाव एमआयडीसी हत्येतील गुरांच्या बाजारासमोरील असलेल्या इलेक्ट्रिक डीपीला आज दुपारी आग लागली. दरम्यान एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोहेकॉ गफुर तडवी यांनी तातडीने अग्निशमन विभागाच्या कार्यालयात फोन लावून आगीची माहिती दिली. तसेच महावितरणच्या कार्यालयात देखील फोनद्वारे कळविले. 

---Advertisement---

दरम्यान काही मिनिटाच्या आत अग्निशमन विभागाचे अग्निशमन बंब घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन ही आग विझवण्यात आली आहे. दरम्यान सायंकाळपर्यंत गीबाबत पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोहेकॉ गफुर तडवी. पोलीस नाईक सुधीर साळवे यांनी यासाठी परिश्रम घेतले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---