जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशन समोर असलेल्या आदर्श इंडस्ट्रीज कंपनीच्या गोडाऊन मधील लाकडाला काल शुक्रवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून या आगीत लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला.

अग्निशमन बंबानी आग आटोक्यात आली कर्मचारी- वाहन चालक देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील, हिरामण बाविस्कर, वसंत कोळी, वाहन चालक- संतोष तायडे, नितीन बारी यांनी आग आटोक्यात आणली.