जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२६ । जळगावसह राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या असून यानंतर आज या महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज सोडत जाहीर झाले आहे. त्यानुसार जळगाव महापालिकेचे महापौरपद हे ओबीसी महिला साठी राखीव निघाले आहे.

यामुळे आता याच प्रवर्गातील महिला महापौरपदी विराजमान होणार असल्याचे अधोरेखीत झाले आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महापौरपदाच्या शर्यतीला सुरुवात होईल. कारण ज्या प्रवर्गासाठी आरक्षण निघेल, त्या प्रवर्गासाठी निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये लॉबिंग सुरू होणार आहे.





