जळगावच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर; असा असेल कार्यक्रम

जानेवारी 24, 2026 11:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२६ । नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत जळगावमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. यांनतर जळगाव महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार असून दोन दिवसांपूर्वीच महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले. यात ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आरक्षण निघाले. मात्र अद्यापही महापौर पदाचा चेहरा जाहीर झाला नाहीय. यामुळे जळगावचा महापौर कोण होणार? याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान अशातच महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

manapa

असा असेल कार्यक्रम
शासनाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या मंगळवार(दि २७) आणि बुधवारी(दि २८) महापौर व उपमहापौर पदाचे नामनिर्देशन अर्ज दाखल केले जाणार आहेत. मनपा आयुक्तांनी विशेष बैठकीसाठी शुक्रवारी विभागीय आयुक्तांना महापौर निवडीसाठी तारीख, वेळ निश्चितीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार ३० किंवा ३१ जानेवारीला महापालिकेची महासभा घेण्यात येणार असून, त्यात महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवड होणार आहे. या निवडणुकीत शहराच्या नेतृत्वाची दिशा ठरणार आहे.

Advertisements

दरम्यान, जळगाव महापालिकेत ओबीसी महिला साठी आरक्षण निघाले असून त्यानुसार महापौरपदी वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी जोरदार लॉबींग सुरू केली आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापत असताना प्रशासकीय पातळीवर महापौर निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.

Advertisements

महापौरपदासाठी रस्सीखेच
दरम्यान, महापालिकेतील भाजपकडून तीन ओबीसी महिलांचे नाव समोर येत असून, यात भाजपचे ज्येष्ठ नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला काळे यांचे नाव पुढे आहे. तर नवीन व मराठा चेहरा म्हणून वैशाली पाटील यांचे नाव समोर येत आहे. त्यामुळे महापौरपद मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now