जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । जळगाव शहर मनपाला 42 कोटींच्या कामांचा निधी मंजूर झाला असूनही शहरात कामांना सुरुवात झाली नाहीये. यामुळे जळगाव शहरातले नागरिक लोकप्रतिनिधींवर नाराज आहेत. आता काय तो या कामांचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावा अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मनपा अधिकाऱ्यांना फैरीवर घेतल.
अजिंठा विश्रामगृहामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 42 कोटींच्या कामाची विशेष बैठक बोलवण्यात आले होती. यावेळी महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभूषण पाटील विरोधी पक्षनेते सुनील महाजन मनपा आयुक्त विद्या गायकवाड आदी मनपा कर्मचारी व इतर नगरसेवक उपस्थित होते.
बैठकीमध्ये निधी मिळूनही विविध अडथळ्यांमुळे सुरू न झालेल्या 42 कोटींच्या कामांच्या पालकमंत्र्यांनी घेतली.
यावे नपा अधिकार्यांकडून यामध्ये त्रुटी असल्याचे सांगण्यात आले. मात्र याचा काय तो आजचा आज सोक्षमोक्ष लावा आणि कामाला सुरुवात करा अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मनपा कर्मचाऱ्यांना वा अधिकार यांना खडे बोल सुनावले. यानंतर लगेचच मनपामध्ये या संदर्भात च्या बैठकीला सुरुवात झाली आहे.