तीव्र डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका ; असू शकतात मेंदूच्या आजाराचे संकेत !

जानेवारी 19, 2026 4:59 PM

जळगावात महादेव हॉस्पीटल येथे न्यूरोलोजी विभागात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

mahadev hospital

जळगाव लाईव्ह न्यूज । धावपळीच्या जीवनशैलीत डोकेदुखी ही एक सामान्य समस्या मानली जाते. मात्र, प्रत्येक वेळी डोकेदुखी म्हणजे केवळ थकवा नसून, ते मेंदूच्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव येथील महादेव हॉस्पिटलतर्फे जनजागृती करण्यात येत आहे.

Advertisements

अनेकदा डोकेदुखीसोबत लक्षणे जाणवल्यास त्वरित सावध होणे गरजेचे आहे. सतत अशक्तपणा जाणवणे, तीव्र अंगदुखी होणे, दृष्टी कमकुवत होणे (धूसर दिसणे), वारंवार चक्कर येणे, चेहरा किंवा शरीराच्या इतर अवयवांना मुंग्या येणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने महादेव हॉस्पीटल येथे तपासणीसाठी यावे. प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ.कमलेश तायडे यांची सेवा नागरिकांना उपलब्ध आहे.

Advertisements

प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे (दिल्ली) यांच्या मते, ही लक्षणे मेंदूला होणारा कमी रक्तपुरवठा, मेंदूतील रक्तस्त्राव किंवा मेंदूतील गाठ (Tumor) यांसारख्या गंभीर आजारांची चिन्हे असू शकतात. वेळेवर उपचार न केल्यास हा धोका जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

जळगावकर नागरिकांसाठी महादेव हॉस्पिटल येथे या आजारांवरील उपचारांची सोय उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विद्यानगर, आकाशवाणी चौक येथे प्रा. एन.जी. चौधरी (9325150004), डॉ. संस्कृती भिरूड, (9588476596) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now