जळगाव जिल्हा

रोखठोक भुमिका, विश्वासार्हतेमुळे ‘जळगाव लाईव्ह’ला प्राधान्य

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२१ । देशातील आणि राज्यातील प्रमुख घडामोडींसह जिल्ह्यातील सर्व बाबी प्रत्येकाच्या स्क्रीनवर पोहचवितांना जळगाव लाईव्ह न्यूजने रोखठोक भूमिका घेतली आहे. जळगाव लाईव्हने आजवर आपली विश्वासार्हता जपून ठेवल्यानेच ते वाचकांच्या पसंतीस उतरले असून लोकप्रिय ठरत असल्याचे गौरवोद्गार सीए शंतनू सोनवणे व राज्य मराठी पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी काढले.

जळगाव लाईव्ह न्यूजच्या वेबसाईटने ५ महिन्यात १ कोटी व्ह्यूवर्सचा टप्पा पूर्ण केल्याने कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी गौरवोद्गार काढले. जळगाव लाईव्हच्या लभोनी संकुल, नूतन मराठा महाविद्यालयाजवळ या मुख्य कार्यालयात केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रसंगी सीए शंतनू सोनवणे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, पंकज भदाणे, हितेश देशमुख यांच्यासह जळगाव लाईव्हचे प्रमुख तुषार भामरे, चेतन वाणी, रजत भोळे, वसीम खान, चेतन पाटील, गौरी मनभास, चिन्मय जगताप आदी उपस्थित होते.

सीए शंतनू सोनवणे म्हणाले की, जळगाव लाईव्हने अल्पावधीतच वाचकांच्या मनावर आपली छाप उमटवली आहे. जळगाव लाईव्ह निष्पक्षपणे बातम्या प्रकाशित करीत असल्याने त्यांची विश्वासार्हता कायम आहे. प्रभागातील रियालिटी चेक, वूमन्स कॉर्नरसारख्या कार्यक्रमातून त्यांनी आपले वेगळेपण जपले असून पुढे देखील ते कायम ठेवतील, असे सोनवणे यांनी सांगितले.

प्रवीण सपकाळे म्हणाले की, जळगाव लाईव्हने शहरासह जिल्ह्यात आपला चांगला ठसा उमटवला आहे. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, गुन्हे घटना-घडामोडी या दैनंदिन बातम्या सह ते नेहमी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करीत असल्याने वाचक त्यांच्याशी जुळत आहेत. ग्रामीण भागातही जळगाव लाईव्हचा बोलबाला निर्माण होत आहे. भविष्यात देखील त्यांची अशीच प्रगती होत राहील असा आम्हाला विश्वास असल्याचे सपकाळे यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button